Emergency Song Singhasan Khali Karo: अभिनेत्री कंगणा राणौत हीचा आगामी चित्रपट इमर्जन्सी यातील पहिलं गाणं रिलीज झाले आहे. 'सिंहासन खाली करो हे' गाणं प्रेक्षकांना खूप पंसत आले आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी कंमेटद्वारा कौतुक केले आहे. गाण्यात कंगना राणौत दमदार स्टाईलमध्ये दिसत आहे. या गाण्यामुळे चित्रपटातील वातावरण आणखीनच उत्साही होते. 'इमर्जन्सी' 6 सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'इमर्जन्सी' हा चित्रपट 1975 मधील भारतातील आणीबाणीच्या परिस्थितीवरील सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात कंगना रणौत इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अनुपम खेर, महेश मांजरेकर, सतीश कौशिक आणि शिवाजी साटम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. (हेही वाचा- कंगना रनौत यांची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री; सदस्यांशी साधला संवाद)
सिंहासन खाली करो गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)