तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांना नोटीस बजावली आहे. टीडीपी पॉलिटब्युरो सदस्य वरला रामय्या यांनी 5 एप्रिल रोजी सीएम जगन रेड्डी यांच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. निवडणुक आयोगाने जगन मोहन रेड्डी यांना 48 तासांच्या आत त्यांची भूमिका मांडण्यास सांगितले आहे, असे न झाल्यास आयोगाकडे अहवाल पाठविला जाईल. त्यानंतर जगन रेड्डी यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)