डिएमकेला इलेक्टोरल बाँड लॉटरीतही मोठ्या प्रमाणात देणग्या मिळाल्या आहेत. DMK ला एकूण 656.5 कोटी रुपयांची देणगी इलेक्टोरल बाँड्सद्वारे मिळाली आहे. ज्यामध्ये लॉटरी किंग सँटियागो मार्टिन फ्यूचर गेमिंगने उदारपणे 509 कोटी दान केले आहेत. DMK ला इलेक्टोरल बाँड्समध्ये मिळालेल्या एकूण पैशांमध्ये लॉटरी किंगकडून 509 कोटी रुपयांचा समावेश आहे. मात्र, केवळ द्रमुकच नाही तर अनेक राजकीय पक्षांना इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. ज्यामध्ये देशातील सर्वात मोठा पक्ष भाजप तसेच काँग्रेस, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (AIDMK), ममता बॅनर्जी यांचा पक्ष TMC, TDP, BRS, शिवसेना, YSR काँग्रेस, RJD, BJD, आम आदमी पार्टी आणि जनसेना पक्ष यांचा समावेश आहे. .

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)