पश्चिम बंगाल मध्ये सध्या पहिलं प्री मान्सून सायक्लोन 'Remal'धडकण्याचा अंदाज असल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळाला ओमन कडून नाव देण्यात आले आहे. Cyclone Remal सध्या Windy वर ट्रॅक केले जात आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. 25 मे पर्यंत ते चक्रीवादळात रूपांतरित होईल असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या वादळाचा परिणाम बांग्लादेश पश्चिम बंगाल, ओडिशा मध्ये होण्याचा अंदाज आहे. तर यामध्ये वार्‍याचा वेग 100 ते 120 किमीप्रति तास असण्याचा अंदाज आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)