भाजपचे दिग्गज नेते आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah ) यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमित शाह यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बुद्धिबळ (Chess) खेळतानाचा एक फोटो अपलोड केला आहे. त्यात त्यांचे नातवंडही दिसत आहे. या फोटोला अमित शाह यांनी कॅप्शनही दिले आहे, जे वाचल्यानंतर युजर्सनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. फोटोला कॅप्शन देताना अमित शाह यांनी लिहिले की, चांगल्या हालचालीसाठी तडजोड करू नका, परंतु नेहमी चांगले शोधत राह.

या फोटोवरून केरळ काँग्रेसने (Congress Kerala) अमित शहा यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. X वर फोटो शेअर करताना काँग्रेसने म्हटले की, "चाणक्य" अमित शाह पांढऱ्या विरुद्ध पांढऱ्या असे बुद्धिबळ खेळत आहेत. खूप सुंदर फोटो सेशन! (हेही वाचा - )

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)