काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. सध्या ही यात्रा दिल्ली येथे आली आहे. दरम्यान, आज काँग्रेसचा 138 वा स्थापना दिन आहे. त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते दिल्ली येथे जमले आहेत. या वेळी राहुल गांधी आणि आई सोनिया गांधी यांची भेट झाली. या वेळी प्रदीर्घ काळानंतर आईला भेटलेले राहुल गांधी त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण अनुभवताना दिसत आहेत. हे आनंद साजरा करत असताना राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ पुढे आला आहे. हा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता.
#WATCH | Congress MP Rahul Gandhi had a joyful moment with his mother Sonia Gandhi during the party's 138th Foundation Day celebration event in Delhi pic.twitter.com/tgqBAxY2co
— ANI (@ANI) December 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)