राहुल गांधी यांनी विदेशात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी लावून धरली. या वेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार हंगामा झाला. ज्यामुळे सभागृहाचे कामकाज चालवणे अध्यक्षांना कठीण होऊन बसले. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी लोकसभेचे कामकाज एक दिवसासाठी स्थगित केले. दरम्यान, लोकसभेचे कामकाज आज पहिल्यांदा 2 वाजता आणि त्यानंतर संपूर्ण दिवसासाठी तहकूब करावे लागले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)