केरळ हायकोर्टाने एका महत्वाच्या निकालात म्हटले आहे की, एखाद्या महिलेचे तिच्या भावाच्या पत्नीद्वारे बॉडी शेमिंग करणे हे कृत्य म्हणजे प्रथमदर्शनी स्त्रीच्या आरोग्यास हानी पोहोचवणारे हेतुपुरस्सर वर्तन आहे, जो आयपीसीच्या कलम 498A अंतर्गत क्रौर्याचा गुन्हा आहे. या प्रकरणातील तथ्यांनुसार, याचिकाकर्त्या भावजयीने तिच्याविरुद्धची फौजदारी कारवाई रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिने सांगितले की, तिचे कृत्य कलम 498A अंतर्गत संबंधित शब्दाच्या कक्षेत येत नाही. त्यावर न्यायमूर्ती ए. बदरुद्दीन म्हणाले की, वैवाहिक घरात राहणारे भाऊ आणि बहिणीचे पती/पत्नी देखील नातेवाईक या अर्थाने कलम 498A अंतर्गत येतात.
न्यायालयाने नमूद केले, ‘जेव्हा याचिकाकर्त्याच्या सांगण्यावरून केलेल्या थेट कृत्यांचे मूल्यमापन केले जाते, तेव्हा तक्रारदाराचे बॉडी शेमिंग करणे तसेच तिच्या वैद्यकीय पदवीबद्दल शंका घेणे हे याचिकाकर्त्यावरचे आरोप आहेत. याचिकाकर्त्याची ही कृत्ये प्रथमदर्शनी हेतुपुरस्सर वर्तन मानले जाते, जे आयपीसीच्या कलम 498A च्या स्पष्टीकरण (A) अंतर्गत महिलेच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यास इजा पोहोचवण्याच्या स्वरूपाचे आहे.’ या प्रकरणात याचिकाकर्ता हा तिसरा आरोपी आहे. पहिला आरोपी तिचा पती, तर मोठ्या भावाची [पत्नी तिसरा आरोपी आहे. (हेही वाचा: घटस्फोटानंतर आईसोबत राहत असलेल्या मुलींना सांभाळण्यासाठी, उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी वडील कायदेशीररित्या बांधील; Karnataka High Court चा महत्वाचा निर्णय)
Body Shaming by Sister-in-Law Is Prima Facie Offence of Cruelty Under Section 498A IPC-
Kerala High Court Says Body Shaming by Sister-in-Law Is Prima Facie Offence of Cruelty Under Section 498A IPC After Woman Approaches Court Seeking Quashing of Criminal Proceedings Against Herhttps://t.co/JNjfAqev96#BodyShaming #Cruelty #KeralaHighCourt
— LatestLY (@latestly) November 18, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)