Bharat Bandh: बुधवारी बिहारमधील गोपालगंजमध्ये अनुसूचित जाती जमाती सेल मोर्चाच्या आवाहनावर भारत बंद अंतर्गत आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी रास्ता रोको केला. याठिकाणी उपद्रवींनी शहरातील अरार मोर येथे आग लावून जोरदार आंदोलन केले. यावेळी मुलांनी भरलेली स्कूल बस घटनास्थळावरून जात असताना, काही आंदोलकांनी स्कूल बस अडवून आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोपालगंज पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारामुळे त्यांना बस पेटवण्यात यश आले नाही. बसमध्ये शाळकरी मुले प्रवास करत होती. बस त्वरीत पुढे सरकल्याने तिला आग लागली नाही आणि मोठा अपघात टळला.
आंदोलकांनी शहरातील अरार मोर येथे रस्त्यावर टायर जाळून वाहतूक ठप्प केली होती. यावेळी मुलांनी भरलेली स्कूल बस तिथून जात होती. बस थांबली पण तिचे चाक जळत्या टायरपर्यंत पोहोचले नाही. दरम्यान, एसपींनी ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. गोपालगंजचे एसपी स्वर्ण प्रभात यांनी सांगितले की, गोपालगंजमध्येही भारत बंदबाबत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा आणि दंडाधिकारी तैनात करण्यात आले होते. (हेही वाचा; VIDEO: बिडी पिण्यासाठी पेटवलेली माचिसची काडी रस्त्यावर टाकल्यामुळे लागली मोठी आग; समोर आला घटनेचा भयानक व्हिडिओ (Watch))
भारत बंददरम्यान स्कूल बसजवळ लावली आग-
Mob Tries To Burn Bus With Children On Board During Bharat Bandh In Bihar https://t.co/n573zBnh4A pic.twitter.com/ksMKnVznMq
— NDTV (@ndtv) August 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)