उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. यासोबतच राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याचीही तयारी सुरू आहे. अयोध्या येथील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास जी महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ते 24 जानेवारी दरम्यान अयोध्या येथे 'अनुष्ठान' होणार आहे. या सोबतच त्यादरम्यान राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा देखील होईल. पीएम नरेंद्र मोदी 22 जानेवारीला अयोध्येला भेट देणार आहेत, त्यामुळे प्राणप्रतिष्ठादेखील 22 जानेवारीला होणार आहे. यासाठी आचार्य सत्येंद्र दास जी महाराज यांनी सर्वांना निमंत्रित केले आहे. ट्रस्ट प्रत्येकाचे स्वागत आणि आदर करेल असे ते म्हणाले. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यासाठी 2500 प्रमुख लोकांची यादी तयार करत आहे. (हेही वाचा: Ganeshotsav 2023: अध्यात्म आणि विज्ञानाचा संगम साधत 'गोडदेवच्या राजा' चा गणेशोत्सव; भाईंदरच्या श्री साईनाथ मित्र मंडळा कडून देशातील शास्त्रज्ञांना महोत्सव समर्पित)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)