Ayodhya Deepotsav 2024: दिवाळीच्या रोषणाईने सध्या संपूर्ण देश उजळून निघाला आहे. अयोध्येत दिवाळी मोठी खास असते. यंदा रामलल्लाच्या अभिषेकानंतर अयोध्येत पहिली दिवाळी साजरी होत आहे. अशा स्थितीत अयोध्या नववधूसारखी सजली आहे. शहरातील प्रत्येक कोपरा दिव्यांनी चमकत आहे. बुधवारी राम मंदिर आणि सरयू काठावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिला दीप प्रज्वलित करून याला सुरुवात केली. सरयू नदीच्या 55 घाटांवर 25 लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले. एकूण 28 लाख दिव्यांची व्यवस्था करण्यात आली होती. जेणेकरून दीपोत्सवासाठी दिव्यांची कमतरता भासू नये.

दीपोत्सवासोबतच आज अयोध्येत एकाच वेळी दोन विक्रम झाले. सर्वात जास्त दिवे लावण्याचा पहिला विक्रम झाला. दीपोत्सवात एकूण 25 लाख 12 हजार 585 दिवे प्रज्वलित करण्यात आले. गेल्या वर्षी 22 लाख दिवे लावले होते. गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली. तर सरयूच्या तीरावर एकाच वेळी 1121 जणांनी आरती केल्याचा विश्वविक्रमही झाला आहे. यासह सरयू घाटावरही लेझर आणि लाईट शो सुरू असून तो प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. दिव्यांनी आणि रंगीबेरंगी दिव्यांनी घाट उजळून निघताना साउंड-लाइट शोच्या माध्यमातून राम लीला सांगितली जात आहे. (हेही वाचा: Diwali 2024: या दिवाळीत चीनला 1.25 लाख कोटी रुपयांचे नुकसान; मेक इन इंडियाची बाजारपेठेत चमक)

Ayodhya Deepotsav 2024: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)