केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि भाजप अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीत पीएम मोदींनी अजमेर शरीफ दर्ग्याला चादर अर्पण केली आहे. दर्ग्यात 811 वा उरूस सुरू झाला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही पीएम मोदी यांनी अजमेर शरीफ दर्ग्याला चादर पाठवली आहे. यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी हे मोदी सरकारमधील ही चादर सादर करण्यासाठी दर्ग्यात जात असत. गेल्या वर्षी आठव्यांदा पीएम मोदींच्या वतीने दर्ग्यावर चादर चढवण्यात आली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)