राष्ट्रीय राजधानीतून मुंबईकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला आगीचा इशारा देण्यात आल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण झाली. विमानाच्या एका इंजिनमधून धूर आल्याने हा इशारा देण्यात आल्याचे एअरलाइनने बुधवारी सांगितले. एअर इंडियाच्या AI 814 विमानासोबत ही घटना मंगळवारी तेव्हा घडली जेव्हा या विमानाने दिल्लीहून उड्डाण केले. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने बुधवारी दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, आगीचा इशारा मिळाल्यावर विमानात आपत्कालीन स्थिती निर्माण झाली असली तरी, विमान सुरक्षीतपणे उतरवण्यात आले. विमानाची आवश्यक तपासणी करण्यात आली मात्र आग किंवा धुराची कोणतीही चिन्हे आढळली नाहीत. सावधगिरीचा उपाय म्हणून, आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली होती आणि हवाई वाहतूक नियंत्रणाला तातडीने कळवण्यात आले होते, असेही प्रवक्त्याने सांगितले.
एक्स पोस्ट
STORY | 'AI Delhi-Mumbai flight experienced fire indication warning'
READ: https://t.co/J0CiNcPAi4 pic.twitter.com/q5kKp7alyX
— Press Trust of India (@PTI_News) December 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)