Mallikarjun Kharge: अमित शाह (Amit Shah)यांच्या बनावट व्हिडिओ (Fake Video)बाबत पोलिसांनी आतापर्यंत अनेकांवर कारवाई केली आहे. याप्रकरणी पंतप्रधान मोदी (PM Modi)यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'भाजप व्हिडीओ बनवण्यात माहीर आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची बदनामी करण्याच्या कल्पना त्यांचीच आहे.'असे खर्गे म्हणाले, 'भाजप लोकांची प्रतिमा मलिन करण्याचे काम करतो, आम्ही ते कधी केले नाही आणि करणार नाही. पंतप्रधान मोदी नेहमीच द्वेषपूर्ण भाषण देतात. द्वेषयुक्त भाषणामुळे समाजात फूट पडते.' (हेही वाचा :Amit Shah Fake Video : अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात मोठी कारवाई, काँग्रेस आणि आपच्या दोघांना अटक; कोण आहेत ते? )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)