Kanpur Shocker: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh)मधील कानपूर (Kanpur)येथे ऑनलाइन बेटिंग गेममध्ये गमावलेले 20,000 रुपये परत न दिल्याने नीटच्या विद्यार्थ्याला(NEET Sudent)निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा चेहरा आगीच्या ज्वालांनी भाजण्यात आला. त्याशिवाय, त्याच्या प्रायव्हेट पार्टला वीट बांधण्यात आली. दहशतीला घाबरून तो पैसे माघारी देईल या उद्देशाने हे कृत्य करण्यात आले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एकीकडे आरोपी दोन मुलांवर अत्याचार करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पीडित मुले आरोपीला हात जोडून नही भय्या अशी विनंती करताना दिसत आहेत. (हेही वाचा:Dogs Attack Girl In Chennai Park: पार्कमध्ये खेळणाऱ्या 5 वर्षांच्या मुलीवर पाळीव कुत्र्यांचा हल्ला, मालकाला अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)