केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये Apple त्यांचा ग्लोबल सप्लायर TDK च्या माध्यमातून भारतातील हरियाणा मध्ये Li-ion battery cells ची निर्मिती करणार आहे. यामुळे 8-10 हजार युवकांना थेट नोकरीची संधी मिळणार आहे. Apple आधीच भारतात आयफोन असेंबल करत आहे आणि पुढील दोन ते तीन वर्षांत चीनमधून भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन हलवण्याची योजना आखत आहे. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा क्युपर्टिनो टेक जायंट देशात मोबाईल फोन घटक तयार करेल. Tata Doubles Down on iPhones: होसूर कारखान्यात आयफोनचे उत्पादन दुप्पट करण्याची टाटाची योजना; मिळणार 28 हजार लोकांना नोकऱ्या .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)