Delhi Assembly Election Result 2025: देशाची राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर, आता निकालांची वेळ जवळ येत आहे. शनिवारी 8 फेब्रुवारी 2025 रोजी निवडणुकीचे निकाल घोषित होणार आहेत. दिल्लीत गेल्या तीन निवडणुकांपासून आम आदमी पक्ष आपला झेंडा फडकवत आहे.  2023 च्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत नसल्याने मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागल्या. यानंतर, 2015 आणि 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली 'आप'ने प्रचंड बहुमताने पुन्हा एकदा सत्ता मिळवली. 15 वर्षांनी दिल्लीत काँग्रेस सत्तेबाहेर पडली. 2025 च्या विधानसभा निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या निकालांमध्ये अडीच दशकांहून अधिक काळानंतर भाजप सत्तेत येणार असल्याचे भाकित करण्यात आले आहे. दुसरीकडे, सलग चौथ्या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती वाईट राहण्याची शक्यता आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले. मतदानानंतर आता सर्वांच्या नजरा निवडणूक निकालांवर खिळल्या आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षासोबत भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार रिंगणात होते. मनोरंजक गोष्ट म्हणजे, आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती, परंतु विधानसभा निवडणुका येईपर्यंत ही युती तुटली आणि दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या. आता टीव्ही9 मराठीवर (TV9 Marathi) तुम्ही या निवडणुकीच्या निकालाचे थेट प्रक्षेपण पाहू शकाल.

Delhi Assembly Election Result 2025 TV9 Marathi Live Streaming:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)