‘Jai Shri Ram’ Slogan Inside Mosque: मशिदीच्या आत जय श्री रामच्या घोषणा दिल्याने कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीत, असे कर्नाटक उच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने मशिदीच्या आत जय श्री रामच्या घोषणा दिल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध दाखल करण्यात आलेली फौजदारी कारवाई रद्द केली. न्यायालयाने सांगितले की यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीत. हा आदेश न्यायालयाने गेल्या महिन्यात दिला होता, परंतु मंगळवारी न्यायालयाच्या वेबसाइटवर तो अपडेट करण्यात आला. तक्रारीनुसार, दक्षिण कन्नड जिल्ह्यातील दोन लोक गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रात्री स्थानिक मशिदीत घुसले होते. तेथे त्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. या आरोपावरून स्थानिक पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला. दोघांनीही आपल्यावरील आरोप रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. मशीद ही सार्वजनिक जागा असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलाने न्यायालयात केला.

सुनावणीदरम्यान, ‘जय श्री राम’ म्हटल्याने समाजावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही, हे न्यायालयाने मान्य केले. उच्च न्यायालयाने म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की 295 (ए) अंतर्गत असे कोणतेही कृत्य गुन्हा ठरणार नाही, जोपर्यंत शांतता आणि समाजात कोणत्याही प्रकारचा गडबड होत नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांविरुद्ध पुढील कारवाई सुरू ठेवण्यास परवानगी देणे हा कायद्याचा दुरुपयोग आहे. (हेही वाचा; New Justice Statue In Supreme Court: न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली, हातात तलवारीच्या जागी संविधान; सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींचा नवा पुतळा)

‘Jai Shri Ram’ Slogan Inside Mosque-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)