कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ( EPFO ) ने 2 मे 2023 रोजी कर्मचारी पेन्शन योजना ( EPS ) अंतर्गत उच्च निवृत्तीवेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली. 3 मे 2023 पासून ही तारीख आता 26 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. EPFO ने 4 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पेन्शनधारक/सदस्यांकडून पर्याय/संयुक्त पर्यायाच्या प्रमाणीकरणासाठी अर्ज प्राप्त करण्याची व्यवस्था केली आहे.
ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत 12 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. ऑनलाइन सुविधा फक्त 3 मे 2023 पर्यंत उपलब्ध राहायची, पेन्शन फंड संस्थेने 2 मे 2023 रोजी रात्री उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हेही वाचा India First Undersea Tunnel: येत्या नोव्हेंबरमध्ये उघडणार भारतातील पहिला पाण्याखालील समुद्र बोगदा; गिरगाव ते वरळी अंतर अवघ्या 10 मिनिटांत
EPFO extends deadline to apply for higher pension till June 26
— Press Trust of India (@PTI_News) May 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)