‘युपीएससी’ तर्फे घेतल्या गेलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 या परीक्षेचे निकाल घोषित झाले आहेत. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबई येथे मुलाखत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ.भावना पाटोळे यांनी कळविले आहे.
या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी 2 जानेवारी 2025 पूर्वी siac@1915@gmail.com या ई-मेलवर अर्ज करावेत. मुलाखत प्रशिक्षण नोंदणीसाठी www.siac.org.in या संकेतस्थळावरील सूचनांचे अवलोकन करावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 022-22070942 येथे संपर्क साधावा असे संचालक, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई यांनी कळविले आहे. (हेही वाचा: PM Internship Scheme: पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत 1.27 लाख संधींसाठी 6.21 लाख अर्ज; निवड प्रक्रिया सुरू)
‘युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)