Byju’s India CEO Arjun Mohan Resigns: एडटेक कंपनी Byju's India चे CEO अर्जुन मोहन (Arjun Mohan) यांनी राजीनामा (Resigns) दिला आहे. 'द इकॉनॉमिक टाइम्स'च्या वृत्तानुसार, अर्जुन मोहन हे पद स्वीकारल्यानंतर 6 महिन्यांहून अधिक कालावधीनंतर कंपनी सोडत आहेत. अडचणीत असलेल्या एडटेक फर्म बायजूसाठी हा मोठा धक्का आहे. बायजूचे संस्थापक रवींद्रन (Baiju Ravindran) तब्बल 4 वर्षांनंतर पुन्हा कंपनीच्या सर्व कामांवर देखरेख ठेवणार आहेत. मोहन यांच्या राजीनाम्यानंतर रवींद्रन आता इंडिया बिझनेस - थिंक अँड लर्नच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी सांभाळतील.

बायजूचे इंडिया सीईओ अर्जुन मोहन यांचा राजीनामा -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)