IndiGo Flight Diverted: सुरतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला पक्ष्याची टक्कर लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. आज सकाळी 8 वाजता सुरत विमानतळावरून उड्डाण घेतलेले इंडिगो फ्लाइट 6E646 अहमदाबादकडे वळवण्यात आले. VT - IZI Airbus A320 Neo फ्लाइट अहमदाबाद विमानतळावर उतरले. डीजीसीएने अधिकृत निवेदनात ही माहिती दिली. या घटनेबाबत पायलटशी बोलले असता त्यांनी सांगितले की, पक्षाने विमानाला टक्कर दिली. सुरुवातीला वैमानिकाला सर्व काही ठीक वाटले. मात्र त्यानंतरच इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे आढळून आले. अशा परिस्थितीत विमान वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि विमान अहमदाबाद विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. मात्र, नंतर प्रवाशांना अहमदाबादहून दिल्लीला नेण्यात आले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)