यावेळी स्वातंत्र्याचा उत्सव विशेष पद्धतीने साजरा केला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि प्रत्येक घरात दिसून यावा यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. हर घर तिरंगा मोहिम असणार आहे. दरम्यान हर घर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून, भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात पाण्याखाली ध्वज प्रदर्शन केले. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे ही या उपक्रमामागील कल्पना आहे असे ICG अधिकारी यांनीसांगितले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)