Driverless Cars In India Update: देशातील ड्रायव्हरलेस गाड्यांबाबत (Driverless Cars) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अतिशय मोठ विधान केलं आहे. गडकरी यांनी भारतात ड्रायव्हरलेस कार सुरू करण्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. चालकांच्या नोकऱ्या कमी झाल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. झिरो माइल डायलॉगमध्ये बोलताना गडकरी म्हणाले, 'मला अनेकदा ड्रायव्हरलेस गाड्यांबद्दल विचारले जाते. यावर मी सांगतो, जोपर्यंत मी परिवहन मंत्री आहे, तोपर्यंत तुम्ही ते विसरा. मी भारतात ड्रायव्हरविरहित कार कधीही येऊ देणार नाही. कारण, यामुळे अनेक लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागतील आणि मी तसे होऊ देणार नाही.' भारतात टेस्लाचे स्वागत आहे, पण चीनमधील उत्पादन भारतात विक्रीसाठी मान्य नाही, असंही गडकरी यांनी यावेळी म्हटलं आहे.

तथापी, जगात अनेक ठिकाणी ड्रायव्हरलेस कारची चाचणी केली जात आहे. गुगलसह अनेक मोठ्या कंपन्या ड्रायव्हरलेस गाड्या रस्त्यावर कशा चालवता येतील यावर काम करत आहेत. असे केल्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने अपघात कमी करता येतील, असा विश्वास आहे. (हेही वाचा - Nitin Gadkari On Diesel Vehicles GST: डिझेल वाहन विक्रीवर 10% GST? नितीन गडकरी यांच्याकडून तातडीने स्पष्टीकरण)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)