Andhra Pradesh Fishing Harbour Fire Video: विशाखापट्टणमच्या मासेमारी बंदरात भीषण आग लागली. पहिल्या बोटीपासून सुरू झालेली आग अखेर 40 बोटींमध्ये पसरली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू आहे. डीसीपी आनंद रेड्डी यांनी सांगितले की, विशाखापट्टणम मासेमारी बंदरात एका बोटीला आग लागली आणि नंतर मध्यरात्री सुमारे 35 फायबर-यंत्रीकृत नौकांमध्ये पसरली. पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने प्रतिसाद दिला. आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)