Budget 2023: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसद भवन संकुलात ही बैठक होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. संसदेच्या प्रत्येक अधिवेशनापूर्वी अशा प्रकारची बैठक यापूर्वी झाली आहे. 31 जानेवारीला आर्थिक सर्वेक्षणाचा अहवालही सादर केला जाणार आहे. यापूर्वी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार असून ते 6 एप्रिलपर्यंत चालणार असल्याचे सांगितले होते. या कालावधीत 66 दिवसांत 27 बैठका होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
The government has convened an all-party meeting today ahead of the Budget Session of Parliament. The meeting will be held in the Parliament House Complex pic.twitter.com/LuBQlXf6OT
— ANI (@ANI) January 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)