Kerala High Court: घटस्फोटाच्या प्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने दागिने आणि इतर साहित्याबाबत मोठा निर्णय दिला आहे. निर्णय देताना न्यायालयाने सांगितले की, बायको पतीकडून सोने किंवा इतर साहित्य तेव्हाच वापस मागवू शकते, जेव्हा ती हे सर्व पतीला दिल्याचं सिद्ध करू शकते. हे सिद्ध झाल्यानंतर पतीला पत्नीला तिचे दागिने वापस करावे लागतील. कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एका प्रकरणात याचिका फेटाळताना केरळ उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन आणि न्यायमूर्ती अजित कुमार यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करताना सांगितले की, पत्नीचे सोन्याचे दागिने पतीच्या नावाने बनवलेल्या लॉकरमध्ये ठेवणे हे त्याच्याकडे सोपवण्यासारखे असू शकत नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)