Mahoba: उत्तर प्रदेशातील महोबा येथे एका 30 वर्षीय बँकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. राजेश कुमार शिंदे असे मृताचे नाव असून ते एचडीएफसी शाखेतील कृषी महाव्यवस्थापक होते. ही घटना 19 जून रोजी घडली. या घटनेचा एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे, ज्यामध्ये राजेश त्यांच्या लॅपटॉपवर काम करताना दिसत आहेत. त्यानंतर अचानक ते त्यांच्या खुर्चीवरून खाली कोसळलतात. त्यांच्या शेजारी बसलेल्या सहकाऱ्यांनी पटकन इतरांना सावध केले आणि राजेश यांना डेस्कवरून एका मोकळ्या जागेत हलवले. त्यांनी राजेशच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले आणि सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, राजेशची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेले, मात्र, तोपर्यंत उशीर झाला झाला. राजेश यांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. हेही वाचा: Sudden Heart Attack Death: मध्य प्रदेशातील एक जुना व्हिडिओ पुन्हा होतोय व्हायरल
यूपी के महोबा जिले में एक बैंक कर्मचारी काम करते-करते अचानक वह बेहोश हो गया है, चंद मिनट में दम तोड़ दिया @NavbharatTimes pic.twitter.com/VW7HoSHmzO
— NBT Uttar Pradesh (@UPNBT) June 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)