Mahira Khan's Emotional Second Wedding:  शाहरुख खानसोबत रईस चित्रपटात दिसलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने दुसरे लग्न केले आहे. माहिराच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये ती स्काय ब्लू लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. माहिराने दुसऱ्यांदा लग्नासाठी तिचा मित्र सलीम करीमची निवड केली आहे. जो व्यवसायाने व्यापारी आहे. लग्नाच्या वेळी सलीमच्या डोळे पाणावले आहे.  दोघांच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहिरा खानने 2007 मध्ये अली अस्करीसोबत लग्न केले पण काही काळानंतर दोघांमध्ये तणाव वाढू लागला. माहिराने 2015 मध्ये अलीपासून घटस्फोट घेतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)