Elvish Yadav Case: एल्विश यादव (Elvish Yadav) चा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) अहवाल उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आला आहे. रेव्ह पार्ट्यांमध्ये (Rave Parties) सापाच्या विषाचा (Snake Venom) पुरवठा केल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. या खुलाशानंतर बिग बॉस फेम एल्विश यादवच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. एल्विश यादव यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकत असल्याचे दिसत आहे. रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाचा पुरवठा केल्याप्रकरणी सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे. नोएडा पोलिसांनी सर्पमित्रांकडून जप्त केलेल्या विषाचे नमुने जयपूर एफएसएलकडे चाचणीसाठी पाठवले होते. एफएसएल अहवालात कोब्रा-कराईत जातीच्या सापांचे विष आढळून आले आहे. (हेही वाचा - Igatpuri Rave Party: ‘बिग बॉस मराठी’ फेम हीना पांचाळ हिच्यासह 25 जणांना न्यायालयीन कोठडी; इगतपूरी रेव्ह पार्टी प्रकरण)
BIG UPDATE ON CASE RELATED TO #ElvishYadav and #RaveParty
Report by #ZeeNews pic.twitter.com/fHJe1ABIIL
— The Khabri (@TheKhabriTweets) February 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)