Bigg Boss Marathi 5: सध्या महाराष्ट्रामध्ये मनोरंजन विश्वात बिग बॉस मराठी सिझन 5ची जोरदार चर्चा सुरु आहे. रितेश देशमुख होस्ट करत असलेला हा सिझन प्रेक्षकांना विशेष भावल्याचे दिसत आहे. आता बिग बॉस मराठी सीझन 5 ने टीआरपी रेटिंगचे सर्व रेकॉर्ड मोडून इतिहास रचला आहे. वीकेंडच्या एपिसोडसाठी शोचा टीआरपी 3.2 वर पोहोचला होता. आता माहिती मिळत आहे की, हा शो 3.9 टीव्हीआर प्राप्त करून नंबर एकचा नॉन फिक्शन शो ठरला आहे. मराठी फ्रँचायझीने असे रेटिंग मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. यंदा बिग बॉस मराठीच्या या सीझनची सोशल मिडियावर बरीच चर्चा सुरु आहे. त्यात रितेश देशमुख हा शो होस्ट करत असल्याने, चाहते आतुरतेने नव्या एपिसोडसह विकेंडच्या ‘भाऊचा धक्का’ची वाट पाहत असतात. असे म्हणता येईल की, रितेश देशमुखच्या शानदार होस्टिंगमुळे बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आणि या रिॲलिटी शोने नवीन उंची गाठली आहे. (हेही वाचा: Bigg Boss Marathi Season 5: जान्हवी किल्लेदार च्या पंढरीनाथ कांबळींच्या 'अभिनय कारकीर्दी'वरील टीप्पणी नंतर विशाखा सुभेदार, अंकुर वाढवे, अभिजित केळकर सह अनेक कलाकारांनी व्यक्त केला संताप)
बिग बॉस मराठी 5 ने तोडले रेटिंगचे सर्व रेकॉर्ड-
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)