बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचं विजेतेपद जिंकल्यानंतर अभिनेता अक्षय केळकर (Akshay Kelkar) ची लोकप्रियता अजून थांबायचे नाव घेत नाहीय. नुकताच अक्षयची बहिण श्रद्धाचा लग्नसोहळा पार पडला. अभिनेत्याने नवविवाहित जोडप्याचा फोटो शेअर करत बहिणीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. अक्षयची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अक्षयने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'माझ्याशी कचाकचा भांडायचीस, तशी भांडू नकोस! तुझा बालिशपणा पण इथेच सोडून जा! त्या सगळ्यांवर आमचाच हक्क आहे! तुझे सगळे हट्ट पूर्ण नाही करता आले पण, तुझ्या रुखवतातला Troffy चा हट्ट पूर्ण केला बरं! बाकी काय, दिल्या घरी तू सुखी रहा! आता माझ्या आमरसामध्ये पार्टनर नसेल याचा खूप खूप आनंद झालेला आहे मला! @hemant_mavlankar आमच्या घरच्या फुलाला जपशीलच याची खात्री आहेच पण तरीही, सांभाळून घे. तुम्हा दोघांनाही, तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. Happy Married Life.'

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kelkar (@akshaykelkar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)