Sidhu Moose Wala Murder Case: सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनी गायकाच्या हत्येची सीबीआय, एनआयए चौकशीची मागणी केली आहे. रविवारी गोळ्या झाडण्यात आलेले पंजाबी गायक सिद्धूमूसेवाला यांचे वडील बलकौर सिंग यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहून केंद्रीय अन्वेषण ब्युरो आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशीची मागणी केली आहे.

मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात सिद्धू मूसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर पंजाब पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 307, आणि 341 आणि आर्म्स अॅक्टच्या कलम 25 आणि 27 अंतर्गत मानसा पोलीस ठाण्यात सिटी-1 येथे एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)