जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनाबद्दल सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. अनेक दिग्गज तसेच कलाकार रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. अशातचं आता मराठमोळा अभिनेता सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी उद्योपतींचे तीन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये एका फोटोमध्ये रतन टाटांविषयीचा लेखही आहे. या पोस्टला कॅप्शन देताना सचिन पिळगावकर यांनी म्हटलं आहे की, 'श्री रतन टाटा यांनी त्यांचे कार्य, दूरदृष्टी आणि उदार अंतःकरणाने केलेल्या अफाट योगदान आणि प्रभावाबद्दल मनापासून आदर. त्यांच्या जाण्याने खरंच खूप मोठं नुकसान झालं आहे.' याशिवाय, सचिन पिळगावकर यांची लेक अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिनेदेखील रतन टाटा यांच्या निधनानंतर पोस्ट शेअर केली आहे. श्रियाने आपल्या पोस्टमध्ये रतन टाटा यांची एक आठवण सांगितली आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)