शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित 'भोंगा' हा मराठी चित्रपट 3 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाला आहे. ट्रेलर आणि चित्रपटाचा विषय पाहून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता होती. परंतु या मराठी चित्रपटाचा प्रेक्षकांनी आनंद घ्यावा असे पोलीस दलाला वाटत नाही, असा आरोप नेते अमेय खोपकर यांनी केला आहे. पोलीस अधिकारी प्रदर्शकांना हा चित्रपट न दाखवण्याचा आग्रह करत असल्याचे खोपकर यांनी ट्वीट करत सांगितले आहे. पोलिसांचे हे कृत्य कोणत्या अधिकारात बसतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
जो चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे, सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे, तो ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावणं, हे पोलिसांच्या कोणत्या अधिकारात बसतं?
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) May 3, 2022
राज्य सरकार हुकूमशहासारखं वागतंय. ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावतायत. पोलिसांना बेकायदेशीर कामं करायला स्वतः गृहखातंच सांगतंय.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) May 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)