चिंची चेटकीण आणि गुप्तधनाची गोष्ट सांगणाऱ्या अलबत्त्या गलबत्त्या नाटकाने रंगभूमी गाजवल्यानंतर आता सिनेमाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला. अभिनेता वैभव मांगले चिंची चेटकिणीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाच्या टीझर मध्ये वैभव चिंची चेटकिणीच्या रूपात दिसत असून "किती गं बाई मी हुशार" हे चेटकिणीचं लाडकं वाक्य ऐकू येते. या चित्रपटात वैभवसोबत अक्षय मिटकल, शंतनू गांगणे, लोकेश मांगडे, मनीष पिंपुटकर, अनुष्का पिंपुटकर, विराज टिळेकर, अभय पिंपुटकर, सोनिया सहस्त्रबुद्धे, यांच्या मुख्य भूमिका आहेत. वरुण नार्वेकर याने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
पाहा टिझर -
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)