Actress Suhasini Deshpande Passes Away: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन झाले आहे. आज मंगळवारी त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी पुण्यतील वैंकुठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मराठीसोबतच त्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले. 2011 मध्ये त्या रोहित शेट्टीच्या 'सिंघम'मध्ये दिसल्या होत्या. हा त्यांचा शेवटचा हिंदी चित्रपट आहे. या गुणी अभिनेत्रीच्या जाण्याने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. रंगभूमीसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना 2015 मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे, जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (हेही वाचा: Asha Sharma Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री आशा शर्मा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन; आदिपुरुष सिनेमात साकरली होती महत्त्वाची भूमिका)
अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन-
ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन; मराठी कलाविश्वावर शोककळाhttps://t.co/SutqShbAMa#suhasinideshpande #marathiactress #सुहासिनीदेशपांडे
— LoksattaLive (@LoksattaLive) August 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)