मल्याळम सिने- अभिनेता विनोद थॉमस यांचे वयाच्या 45 व्या वर्षी निधन झाले आहे. केरळ राज्यातील पंपाडीजवळील एका हॉटेलमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये अभिनेता मृतावस्थेत आढळून आला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी तपास करीत आहेत. मृत्यूचे कारण केरळा पोलीस शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. विनोद थॉमस हे मल्याळम सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित अभिनेते होते. 'अय्यप्पनम कोस्युम', 'नाथोली ओरू चेरिया मीनाल्ला', 'ओरू मुराई वंथ पथया', 'हॅपी वेडिंग' आणि 'जून' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)