मल्याळम सिनेमा '2018- Everyone is a Hero'ची यंदा भारताकडून Oscars 2024 साठी Official Entry करण्यात आल्याची माहिती Film Federation of India कडून देण्यात आली आहे. Jude Anthany Joseph यांचा हा सिनेमा असून केरळ राज्याला उद्ध्वस्त करणाऱ्या ऑगस्ट 2018 च्या दुर्दैवी महापुरावर आधारित आहे. केरळ राज्यातील या पुरात 14 जिल्हे बाधित झाले होते 500 हून अधिक लोक मरण पावले आणि 15 लोक बेपत्ता झाले होते. हा चित्रपट सामान्य नागरिकांनी दाखवलेल्या विलक्षण धैर्य आणि एकतेवर बेतला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)