लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्ताने जगभरातील त्यांच्या चाहत्यांना आज त्यांच्या आयुष्यात नकळत एक पोकळी निर्माण झाल्याची भावना जाणवत आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी जाहीर कार्यक्रमामध्ये पु ल देशपांडे यांनी लताबाईच्या आवाजाबददल गौरवोद्गार काढताना या जगात देव आहे का मला माहीत नाही पण या आकाशात ज्या तीन गोष्टी आहेत त्या म्हणजे चंद्र, सूर्य आणि लताचा स्वर! हे मी ठामपणे सांगू शकतो. आज लता मंगेशकर यांचं निधन झाल्याने त्यांचा देह आता पंचत्त्वामध्ये विलीन होईल पण त्यांचा आवाज  आपल्या प्रत्येकाच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहील ही भावना अनेकांनी बोलून दाखवली आहे.

पहा पुल देशपांडे यांचा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)