Lahore 1947: दीर्घ काळानंतर प्रीती झिंटा वळली सिनेसृष्टीकडे; 'लाहोर 1947' च्या शूटिंगला सुरुवात

मोठ्या कालखंडानंतर प्रीती झिंटा मोठ्या पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रीती झिंटाने तिच्या आगामी 'लाहोर 1947' या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. त्याबाबतची माहिती तिने तिच्या इन्सटाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे.

Lahore 1947: दीर्घ काळानंतर प्रीती झिंटा वळली सिनेसृष्टीकडे; 'लाहोर 1947' च्या शूटिंगला सुरुवात

Lahore 1947: प्रीती झिंटा (Preity Zinta) दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर धमाका करण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्रीने आगामी 'लाहोर 1947' या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. ही माहिती तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) दिग्दर्शित 'लाहोर 1947' (Lahore 1947)या चित्रपटात प्रिती सनी देओलसो (Sunny Deol)बत दिसणार आहे. प्रीती या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. सनी आणि प्रीती याआधी 'द हीरो', 'फर्ज' आणि 'भैय्या जी सुपरहिट' सारख्या चित्रपटात दिसले आहेत. आता या जोडीला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. (हेही वाचा : Neha Kakkar Hot Video: नेहा कक्करने चाहत्यांना मनमोहक स्टाईलने केले थक्क, गायिकेच्या हॉटनेसने चाहते घायाळ, [पाहा व्हिडीओ])

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2024 10:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).