सध्या 'लायगर' (Liger) चित्रपटाची सिनेविश्वात खूप चर्चा आहे. साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) दोघेही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. विजय देवरकोंडा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. तो लायगरचा जागोजागी प्रचार करत आहे. दरम्यान, पुण्यातून एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लायगरच्या प्रमोशनदरम्यान ते पुण्यातील एका मॉलमध्ये पोहोचले होते. या व्हिडिओमध्ये विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे चारही बाजूंनी चाहत्यांनी घेरलेले दिसत आहेत. विजय देवरकोंडाची चाहत्यांमध्ये काय क्रेझ आहे हे आपल्याला चांगलेत दिसुन येत आहे. अभिनेत्याची एक झळक पाहण्याठी पुणेकरांनी तोबा गर्दी केली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)