नुकतेच आयएमडीबीने या आठवड्यात ट्रेंडिंग असलेल्या 'लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटीं’ची यादी जाहीर केली आहे. जगभरातील लाखो चाह्त्यांद्वारे मिळालेल्या पेज व्ह्यूजच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे. या यादीमध्ये राशी खन्ना पहिल्या स्थानावर असून, शाहरुख खानला दुसरे स्थान मिळाले आहे. अभिनेता विजय सेतुपती हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये आदित्य चोप्रा, दीपिका पदुकोण, कादर खान, शाहीद कपूर, अनुपम खेर, भुवन अरोरा, राम चरण तेजा, सलमान खान, यश चोप्रा, आमिर खान यांसह 21 जणांना स्थान मिळाले आहे.

आयएमडीबी- द इंटरनेट मूव्ही डेटाबेस- हा एक ऑनलाइन डेटाबेस असून, तो चित्रपट, टीव्ही शो आणि व्हिडिओ गेम तसेच अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट उद्योगातील इतर व्यावसायिकांबद्दल माहिती प्रदान करतो. या ठिकाणी तुम्ही पाहिलेल्या चित्रपट-शोला रेटिंग देऊ शकता तसेच रिव्ह्यूदेखील लिहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)