सोहम शाह दिग्दर्शित आणि श्रेयसची मुख्य भूमिका असलेल्या 'कर्तम भुगतम' या सायकॉलिजिकल थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्याला हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. श्रेयसने स्वतःच्या या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'फक्त 10 दिवसांसाठी एका कामासाठी न्यूझीलंड मधून माझ्या शहरात आलो होतो. एका ज्योतिषाने सांगितलं सुद्धा की मी परत कधीही जाऊ शकणार नाही. आता मी इथे अडकलो आहे. मी कधी परत जाऊ शकेन का?की कधीच नाही?- देव जोशी'.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)