काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. याबाब तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला होता. आता पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आले आहे की, तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र दिले होते. पत्र पोहोचवण्यासाठी त्याच्या टोळीतील तीन जण राजस्थानच्या जालोर येथून मुंबईत आले होते आणि त्यांनी आरोपी सौरभ महाकालची भेट घेतली होती. बिष्णोईचा साथीदार विक्रम बरड याने हे पत्र सलीम खान यांच्यापर्यंत पोहोचवले असल्याचे आरोपी सौरभ महाकालने सांगितले. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)