प्रभास स्टारर चित्रपट 'सलार' जगभरात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटाने 3 दिवसात 402 कोटींचा टप्पा पार केला असून चौथ्या दिवशी हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. या अॅक्शन थ्रिलरमध्ये प्रभासशिवाय पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रशांत नीलने साकारलेला खानसारचा संसार प्रेक्षकांना आवडला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)