Salaar Box Office Collection: प्रभासच्या 'सालार'ने दोन दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर केली जबरदस्त कमाई, 295 कोटींचा आकडा केला पार

'सालार'ने रिलीज होताच खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 95 ते 97 कोटी रुपयांची कमाई केली, तर प्रभासच्या 'सालार' चित्रपटाने दुसऱ्या दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 295 कोटींचा आकडा पार केला आहे.

Salaar Box Office Collection: प्रभासच्या 'सालार'ने दोन दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर केली जबरदस्त कमाई, 295 कोटींचा आकडा केला पार

Salaar: 'साहो', 'राधे श्याम' आणि 'आदिपुरुष' फ्लॉप झाल्यानंतर 'बाहुबली' स्टार प्रभासने (Prabahs) 'सालार' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. जगभरात 'सालार' (Salaar) चित्रपट पाहण्याची जबरदस्त क्रेझ आहे. या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांत चांगली कमाई करून खळबळ उडवून दिली आहे. 'सालार'ने रिलीज होताच खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 95 ते 97 कोटी रुपयांची कमाई केली, तर प्रभासच्या 'सालार' चित्रपटाने दुसऱ्या दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 295 कोटींचा आकडा पार केला आहे. 'केजीएफ 2' फेम दिग्दर्शक प्रशांत नीलने त्याच्या 'सालार' या दुसऱ्या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. दुस-या दिवशी, चित्रपटाने जगभरात एकूण 295.7 कोटींची कमाई केली, त्यानंतर चित्रपटाने 300 कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला. प्रभासचा चित्रपट यावर्षी अनेक विक्रम मोडणार आहे. (हे देखील वाचा: Dunki Box Office Collection Day 3: शाहरुख खानच्या डंकी चित्रपटाने तीन दिवसात जगभरातून कमावले 157 कोटी)

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 24, 2023 10:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).