Salaar Hindi Trailer: गेल्या काही दिवसांपासून प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार: पार्ट 1 सीझफायर' (Salaar) या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. अभिनेता प्रभासचा (Prabhas) हा एक महत्त्वाकांक्षी चित्रपट मानला जात आहे. प्रभासचे चाहते चित्रपटगृहात हा चित्रपट येण्याची वाट पाहत असताना, आता त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये प्रभासची जबरदस्त स्टाइल दिसून येत आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'सालार'ची कथा वर्धराज (पृथ्वीराज सुकुमारन) आणि देव (प्रभास) या दोन मित्रांभोवती फिरते. देव वर्धराजसाठी काहीही करायला तयार असतो, पण नंतर दोघेही एकमेकांचे मोठे शत्रू बनतात, असे दाखवण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये उत्तम अभिनय, अॅक्शन, डॅशिंग लूक्स, व्हीएफएक्स अशा अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत. 'सालार' मध्ये प्रभास आणि पृथ्वीराजसह श्रुती हासन, जगपती बाबू, ईश्वरी राव, टिनू आनंद, श्रिया रेड्डी, माइम गोपी असे कलाकारही दिसणार आहेत. प्रभासचा हा चित्रपट तेलगू, मल्याळम, तामिळ, कन्नड आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

'सालार' सुरुवातीला 28 सप्टेंबरला रिलीज होणार होता, पण नंतर पोस्ट प्रोडक्शनचे काम पूर्ण न झाल्यामुळे तारीख पुढे ढकलण्यात आली. यानंतर 22 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली, ज्या दिवशी शाहरुख खानचा ‘डंकी’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. (हेही वाचा: Animal OTT Release: अॅनिमल चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज, 'या' दिवशी Netflix वर प्रदर्शित)

पहा 'सालार' चित्रपटाचा ट्रेलर-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)