'घुमर' सिनेमामध्ये अभिनेत्री Saiyami Kher एका दिव्यांग क्रिकेटपटूची भूमिका साकारत आहे. या सिनेमाची कथा जिद्दीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येतं यावर आधारित आहे. नुकताच हा सिनेमा 'क्रिकेटचा देव' मानला जाणार्‍या सचिन तेंडुलकरने पाहिला आणि एका हाताने बॉलिंग करण्याची Saiyami Kher ची अदा पाहून आवाक झाला. जेव्हा तो सैय्यमी ला भेटला तेव्हा त्याने स्वतः बॉल तिच्या हातात देत कशी बॉलिंग केलीस ते दाखवण्याचा हट्ट केला. प्रत्यक्ष सैय्यमीला बॉलिंग करताना पाहून तिच्या या कौशल्यावर त्यानेही आश्चर्य व्यक्त करत मी कधीच अशी बॉलिंग केलेली पाहिलं नसल्याचं म्हणत तिला कौतुकाची थाप दिली. सोबतच वर्षभर हात दुमडून राहणं म्हणजे खांद्याला किती त्रास होऊ शकतो याची कल्पना असल्याचंही तो तिला व्हिडिओ मध्ये म्हणताना दिसत आहे.

पहा सचिन कडून सैय्यामीचं कौतुक होताना

 

View this post on Instagram

 

A post shared by Saiyami Kher (@saiyami)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)