Rohit Bal Passes Away: प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांचे निधन झाले आहे. ते दीर्घकाळापासून हृदयविकाराने त्रस्त होते. 1 नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडियाने (FDCI) या दु:खद बातमीला दुजोरा दिला आहे. रोहित बल हे फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडियाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल गेल्या वर्षभरापासून हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर आज वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने केवळ फॅशन जगतच नाही तर संपूर्ण देशाला धक्का बसला आहे.

देशातील लोकप्रिय फॅशन डिझायनर रोहित बल यांचा जन्म 8 मे 1961 रोजी श्रीनगरमध्ये झाला. त्यांनी मुघल फॅशनचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला. रोहित बलचे मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, अहमदाबाद आणि चेन्नईसह अनेक शहरांमध्ये स्टोअर्स आहेत. रोहित हे मनोरंजन विश्वातही खूप प्रसिद्ध होते. त्यांनी अमिताभ बच्चन, काजोल, ईशा गुप्ता, कंगना राणौत, पूजा हेगडे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींसाठी कपडे डिझाइन केले आहेत. (हेही वाचा: Neena Kulkarni Death Rumours: अभिनेत्री निना कुळकर्णी यांच्या निधनाच्या चर्चा केवळ अफवा, बातम्याही निराधार)

Rohit Bal Passes Away:

 

View this post on Instagram

 

A post shared by FDCI (@fdciofficial)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)